शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : रविवार, 22 सप्टेंबर 2024 (09:52 IST)

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

khandoba
कर्‍हेच्या पाठारीं नांदे मल्हारी ॥
रहिवास केला कनक शिखरीं ॥
अर्धांगीं शोभे म्हाळसा सुंदरीं ॥
प्रीती आवडली बाणाई धनगरीण ॥
जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती ॥
आरति (भावार्थी) ओवाळुं तव चरणाप्रती ॥जयदेव जयदेव ॥१॥
कनक पर्वत तुझा दृष्टीं देखिला ॥
उल्हास झाला सकळा भक्तांला ॥
तयासीं वाटे पैं दिनकर उगवला ॥
तयें ठायीं अवतार देवा त्वां धरीला ॥जयदेव० ॥२॥
कुळस्वामी सकळांचा मल्हारी होसी ॥
चुकलिया भक्ता शिक्षा लाविसी ॥
त्राहि त्राहि ह्मणूनी चरणा (पाया) लागलों ॥
क्षमा करी अपराध तुज बोलिलों ॥जयदेव ॥३॥
तुझें उग्ररुप सकळिक देखिलें ॥
भय तया वाटतां अभय त्वां दिधलें ॥
सकळा जनाचें भय फिटलें ॥
येऊन चरणा (पाया) पाशीं तुझिया लागले ॥जयदेव० ॥४॥
त्रिशुळ डमरु खड्‌ग हारती घेतलें ॥
वाम हस्तें कैसें पात्र शोभलें ॥
मणिमल्ल दैत्य चरणीं (पायीं) मर्दिंले ॥
थोर भाग्य (पुण्य) त्याचें चरणीं ठेविलें ॥जयदेव० ॥५॥
प्रचंड दैत्य वधूनी आनंद झाला ॥
सकळ देव तुज करिती जय कारु ॥
ऐसा प्रताप तुझा नकळे मज पारु ॥
सकळा जनाचा (भक्ताचा) होसिल दातारु ॥जयदेव० ॥६॥
नित्य आनंद होतसे सोहळा ॥ भंडार उधळण साजे तूजला ॥
भक्त जन शरण येती तूजला ॥ त्यांच्या कामना पुरविसी अवलीला ॥जयदेव० ॥७॥
मोरया गोसावी मज ध्यानीं मनीं ॥ तयाच्या कृपेनें वर्णिलें तुज ध्यानीं ॥
आणिक वर्णावया शिणली ही वाणी ॥ दास मोरयाचा ह्मणे चिंतामणी ॥जय० ॥८॥
 
Edited by Priya Dixit