रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (08:05 IST)

मोदींचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातल्या दुसऱ्याही सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, त्याच्याशी संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवार तरी सहमत आहेत का? तुम्ही शिवरायांच्या भूमीत जन्म घेतलाय, गप्प राहू नका, असं आवाहन करत मोदींनी शरद पवारांना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया देण्याचं आवाहन केलं. शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांची सध्या झोप उडालेली आहे, असा गौप्यस्फोट मोदींनी केला.
 
राष्ट्रवादीवर टीका करताना मोदी म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप का उडालीय? त्यांची झोप उडवणारा व्यक्ती दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद आहे. तो काही बोलेल का या भीतीने त्यांची झोप उडाली आहे,”असं म्हणत मोदींनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला.