मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2019 (09:39 IST)

तुमच्या फॅमिलीचं काय ? अजित पवारांचा मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिलंय. आमच्या फॅमिलीचं काय घ्यायचंय तुम्हाला, तुमच्या फॅमिलीचं काय असं म्हणत अजित पवारांनी मोदींना टोला लगावला. पंतप्रधानांनी देशाच्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर बोलण्यापेक्षा पवार फॅमिली बद्दल बोलण्याची काही गरज नव्हती, असंही अजित पवार म्हणाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत पवार कुटुंबावर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पक्षावरील पकड सुटली आहे. त्यांचा पुतण्या अजित पवारांचं पक्षावर वर्चस्व असल्याचं मोदी म्हणाले होते. पवारांनी माढ्यातून माघार घेतली त्यावरही मोदींना निशाणा साधला. जनतेने निवडणुकीच्या अगोदरच अनेकांना मैदान सोडून पळवलंय, असा टोला त्यांनी लगावला होता.