मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (14:46 IST)

कोलकाताचा 121 वर्ष जुना ऍथलेटिक क्लबाला आग लागली

पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये 121 वर्ष जुना वारी ऍथलेटिक क्लबाला आग लागली. घटनेबद्दल माहिती मिळताच आग बुजविण्यासाठी चार फायर इंजिन पाठविण्यात आले होते पण त्यांच्या पोहोचण्याअगोदरच क्लब पूर्णपणे जळून खाक झाला होता. या दरम्यान, क्लबाची देखभाल करणारा एक कर्मचारी देखील आगीने भाजला झाला.
 
121 वर्ष जुन्या वारी ऍथलेटिक क्लबाचा भारतीय फुटबॉलच्या इतिहासात एक मोठा योगदान आहे. क्लबाने अनेक फुटबॉल खेळाडूंना तयार केले होते. क्लब सचिव इंद्र नाथ पाल यांनी सांगितले की त्यांचा क्लब सर्वात जुन्या संस्थांपैकी एक होता. साक्षीदारांनी सांगितले की गुरुनानाक साईराणी येथे असलेल्या क्लबाला जळताना सर्वात प्रथम सकाळी 5 वाजता फिरत असलेल्या लोकांनी पहिलं आणि फायर इंजिन पोहोचण्यापूर्वी तो पूर्णपणे जळाले होते. क्लबच्या देखरेखीसाठी रात्री दोन कर्मचारी तिथे थांबायचे. त्यांनी सांगितले की आगीत अनेक ट्राफी आणि कागदपत्रे जळाली आहे.