बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2019 (09:55 IST)

तीस लाख रुपयांचे कफ सिरप सर्दीला नाही तर यासाठी विकत होते पोलिसांनी केले अटक

कफ सिरप म्हटले की ते सर्दी पडसे ताप आदी साठी असते, तर त्याची किंमत सुद्धा माफक असते. मात्र हे कफ सिरप उपचार न ठरता नशा ठरले तर, असाच प्रकार मुंबईत उघड झाला आहे. नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं तब्बल 30 लाख रुपयांचं कफ सिरप पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केले असून, मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान परिसरातून कफ सिरपच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो पकडला आहे. टेम्पोमध्ये तब्बल  30 लाख रुपये किंमतीचे  नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं औषध होते. पोलिसांनी या गंभीर प्रकरणी चौघांना अटक केली आहे.
 
अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुजरात येथून, ‘कोडेन फॉस्फेट’ सिरपचा साठा मुंबई शहरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. सिरप मुख्यत नशेबाज नशा करण्यासाठी वापरत होते. या माहितीच्या आधारे पथकाच्या अधिकाऱ्यांनी तपास करण्यास सुरुवात केली. दबंग पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटने मरिन लाइन्स येथील बडा कब्रिस्थान येथून कफ सिरपने भरलेला एक टेम्पो ताब्यात घेतला. या प्रकरणी वीरेंद्र सिंग, अझहर जमाल सय्यद, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख या चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हा टेम्पो तसेच टेम्पोमध्ये लपवण्यात आलेल्या 5,760 कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.