बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (09:51 IST)

राष्ट्रवादी कन्हैया कुमारचा प्रचार करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हैया कुमार याचा बेगूसरायमध्ये प्रचार करणार आहे. तसेच राष्ट्रवादी महाआघाडीत असल्यामुळे राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांचा प्रचार देखील अमेठी आणि रायबरेलीत करणार आहे, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी केली आहे. कन्हैया कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे बेगसूरायमध्ये निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीने त्याला आपला पाठींबा जाहीर केला. त्याचप्रमाणे त्याच्या प्रचारात देखील राष्ट्रवादी सहभाग घेणार आहे.
 
त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर ज्या ज्या ठीकाणी महाआघाडीचा उमेदवार असेल, तिथे तिथे आम्ही प्रचार करू अशी घोषणा देखील डी.पी. त्रिपाठी यांनी केली आहे. बनारसमधून मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा एक उमेदवार देण्याबाबत विचार सुरु असल्याचेही त्रिपाठी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. निवडणूक आचारसंहितेचे सक्तीने पालन व्हायला हवे. एखाद्याचा बायोपिक येणार असेल तर त्यातील गोष्टींकडे निवडणूक आयोगाने लक्ष देवून कारवाई करायला हवी, असेही त्रिपाठी म्हणाले.