1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2019 (08:31 IST)

बनावट कॉल सेंटर प्रकरणी फरार बॉलीवूड अभिनेत्रीला बेड्या कोण आहे ही अभिनेत्री

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ९ च्या पोलिसांनी सप्टेंबर २०१८ साली अंधेरी येथे सुरू असलेल्या बनावट कॉलसेंटरवर कारवाई केली होती. कारवाईतील फरार मुख्य आरोपी तरुणी पोलिसांनी अटक केली आहे. आरती सक्सेना असं या अटक अभिनेत्रीचं नाव आहे. बॉलीवूडमधील मॉडेल, गायिका, अभिनेत्री आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी तिने यामध्ये ही स्वत:चे पैसे गुंतवल्याचं तपासात उघड झाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना सप्टेंबर २०१८ मध्ये अंधेरीच्या डी.एन.नगर परिसरातील एस.व्ही.रोडवरील बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी कॉल सेंटरवर कारवाई केली होती.. एक्सफिनिटी, इनोव्हेशन ३६० अशी या दोन कॉल सेंटरची नावे असून, दोन्ही कंपनीद्वारे अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधून संबंधित संगणक, लॅपटॉपवर मालवेअरसारख्या भयानक सायबर हल्ला केल्याचं सांगत तो काढण्यासाठी पैसे मागत होते, पैसे न पाठवल्यास डेटा डिलिट करण्याची धमकी द्यायचे यातून लाखो रुपये लुटले होते. शाखेच्या पोलिसांनी त्यावेळी ९ जणांना अटक केली होती. डिसेंबर महिन्यात पोलिसांनी संबंधितांविरोधात ३ हजार ६०० पानी दोषारोपपत्रही दाखल केले. त्यात अमेरिकेतील नागरिकांनी ट्विटरद्वारे केलेल्या १७ तक्रारी आणि ३० जणांच्या जबाबाची नोंद करण्यात आली आहे.