शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईच्या तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ

Mumbai temperature increases
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई परिसराच्या तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढल्यामुळे जीवाची काहिली वाढू लागली आहे. रविवारी मुंबईत सांताक्रूझ येथील तापमान 37.8  अंश सेल्सिअस नोंदले गेले. नवी मुंबई 40, ठाणे 42.8 आणि रायगडात 43.5 कमाल तापमानाची नोंद झाली आहे. 
 
येत्या दोन दिवसांत तापमानाचा पारा आणखी 1 ते 3 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारपासूनच मुंबईकरांना तापमानातील फरक जाणवायला लागला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच वाढलेल्या तापमानाने मुंबईकरांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थतेची जाणीव झाली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार देशाच्या बहुतांश भागात तापमान 2 ते 3 अंशांनी वाढले आहे. पूर्वेकडील उष्ण वार्‍यांनी मध्य महाराष्ट्रसह मुंबई परिसराचाही  पारा वाढला आहे.