मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 30 मार्च 2019 (07:07 IST)

राज्यात भाजपच्या एक हजार सभा मोदींची वर्ध्यात सुरुवात तर मुंबईत प्रचार सभेने शेवट

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर पकडला आहे. सर्वच पक्ष आता प्रचाराची रणनीती ठरवत असून त्यांचे प्रचारक मैदानात उतरवत आहेत. सत्ताधारी भाजपाने  प्रचाराची रणनीती ठरवाली असून, राज्यात भाजपा एक हजार सभा घेणार आहेत. यामध्ये सर्वच सभांचा समावेश करण्यात आला आहे. सभांसाठी राज्यातील,  केंद्रातील नेते देखील हजेर होणार आहेत. यामध्ये महत्त्वाची असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील राज्यात आठ सभा आयोजित केल्या असून, याची सुरुवात एक एप्रिलपासून होत आहे. नरेंद्र मोदी यांची प्रथम जाहीर सभा वर्धा येथे एक एप्रिलला सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच मोदींची शेवटची सभा ही मुंबईत होणार आहे. 
 
राज्यामध्ये संभाना केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या शह भाजपाचे इतर ज्येष्ठ जेते देखिल उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७६ हून अधिक सभा राज्यामध्ये घेणार आहेत. त्यापैकी भाजपाच्या २५ उमेदवारांसाठी प्रत्यकी २ आशा मिळून ५० तर शिवसेना उमेदवारासाठी प्रत्येकी एक सभा आशा २३ सभा मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे भाजपची आता प्रचाराची जोरदार तयारी झाली असून यामुळे विरोधकांना देखील तितक्याच ताकदीने त्यांच्या समोर उभे राहावे लागणार आहे.