सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2019 (16:50 IST)

शरद पवारांनी साथ द्यावी ही माझी शेवटची निवडणूक - सुशीलकुमार शिंदे

ही लोकसभा निवडणूक आता माझी शेवटची निवडणूक असून, या शेवटच्या निवडणुकीत मला जेष्ठ नेते शरद पवार यांची मोलाची साथ हवी असे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मत व्यक्त केले आहे. सोलापुर येथ आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या निर्धार मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले की “शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची मला साथ दिली पाहिजे. शरद पवारांनी मला राजकारणात आणल असून, मी अनेकवेळा निवडणुका लढविल्या आहेत. मात्र मी शरद पवारांची कधीही साथ सोडली नाही. मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे आहे. ते पुढे म्हणाले की देशाला मोदींनी कोठे नेऊन ठेवलय यावर आता काही न बोललेल बरं आहे. एखादा खासदार निवडून आला, तर त्याला परत बदलत नाहीत, मात्र सोलापूरमध्ये भाजपने उमेदवार बदलला आहे. असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे. यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते.