शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (07:53 IST)

सोमय्या यांचे तिकीट कापले

खासदार किरीट सोमय्या यांचे भाजपने तिकीट कापले आहे. उत्तर पूर्व मुंबईतून भाजपकडून लोकसभेसाठी सोमय्या यांच्या ऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे ते उमेदवार असतील. भाजपने आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची आणखी एक यादी प्रसिद्ध केली. या यादीत उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या यादीत उत्तर प्रदेशातील पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे.
 
मनोज कोटक यांची ईशान्य मुंबईत चांगली कामगिरी आहे. याचा विचार करुन त्यांना ही संधी देण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोटक यांच्या कामकाजावर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे.