शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

म्हातारा बाप सहा वर्षांपासून करत होता मुलीसोबत दुष्कर्म

father raped daughter in Delhi
दिल्ली: साऊथ एक्स भागात म्हातारा बाप सहा वर्षांपासून मुलीसोबत दुष्कर्म करत होता. त्याने मुलीला जीवाची धमकी देखील दिली होती. भीतीमुळे मुलीने कोणालाही या घटनेबद्दल काही सांगितले नाही. 
 
दक्षिण जिल्हा पोलिस अधिकार्‍यांप्रमाणे आरोपी नेपाली 60 वर्षीय बाप साऊथ एक्समध्ये कोठीत काम करतो. तो कुटुंबासह त्यात कोठीच्या सर्वेंट क्वार्टरमध्ये राहतो. 22 वर्षीय मुलीने तक्रार दाखल केली की तिचे वडील मागील सहा वर्षांपासून तिचं शारीरिक शोषण करत आहे आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत होता.
 
वडिलांचा छळ वाढत गेला तेव्हा तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. आईने मालकिणीला याबद्दल माहिती दिली. मालकिणीने या बद्दल पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरण दाखल करून आरोपी बापाला अटक केली.