1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2019 (09:36 IST)

काँग्रेसचा जाहीरनामा हा देश तोडणारा

काँग्रेसचा जाहीरनामा हा देश तोडणारा असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. काँग्रेसच्या घोषणा पत्रात देशद्रोहाचा गुन्हा हटवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. देश तोडणारे आश्वासन देणारी काँग्रेस एकाही मताची हकदार नाही. नियम आणि कायद्याची समीक्षा करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नक्षलवाद्यांना वाचवण्यासाठी सीआरपीएफमध्ये बदल करण्याची घोषणा केल्याचा आरोप जेटलींनी केला आहे.
 
जम्मू काश्मीरमध्ये सेना आणि सीआरपीएफ सैनिकांच्या संख्येत कपात करणे तसेच अफस्पाचे प्रावधान कमजोर करण्याचे म्हटल्याचे जेटली म्हणाले. काँग्रेसच्या घोषणापत्रात खतरनाक आश्वासने दिली आहेत. जे नियम पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी नाही हटवले त्यांना हटवण्याची भाषा राहुल गांधी करत असल्याचा टोला जेटलींनी लगावला आहे.