मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2019 (09:49 IST)

अन्य पक्षात जाण्याचा विचार या जन्मात तरी नाही !मधुकर पिचड यांचे स्पष्टीकरण..

मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संस्थापक-सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रस पार्टी आणि शरद पवार साहेबांवर माझी नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे अन्य कोणत्या पक्षात जाण्याचा विचार या जन्मात तरी माझ्या डोक्यात येणार नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी व्यक्त केली आहे.
 
काही दिवसांपासून पिचड भारतीय जनता पक्षासोबत जात असल्याची बातममी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ती बातमी पिचड यांनी फेटाळून लावली आहे. मधुकर पिचड काही दिवसांपासून मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदारसंघांत फिरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.