मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 मार्च 2019 (16:15 IST)

सचिन तेंडूलकरने घेतली या दिग्गज राजकारण्याची भेट

क्रिकेट मधील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.मात्र भेटीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ  शकले नाही. शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी जाऊन सचिनने पवारांची भेट घेतली व चर्चा केली आहे.
 
देशभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. त्याचमुळे मागील काही दिवसांपासून विविध पक्षाचे राजकीय नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतांना आपण पाहत असतो तर अनेक कलाकार देखील पक्षात प्रवेश करत  आहेत. हे सर्व निवडणुकीत सुरु आहेत त्यात  सचिन तेंडुलकरने शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने, या भेटीचे नेमके कारण काय हे शोध घेणे सुरु आहे. सचिन जवळपास अर्धा तास पवारांच्या घरी चर्चे साठी थांबला  होता. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती देणं सचिनने टाळल आहे.