शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

खुल्या खाद्यपदार्थावर रेल्वेने अखेर घातली बंदी, कुर्ला शरबत प्रकरणाने आली जाग

रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या लिंबू सरबत किती घाणेरड्या पद्धतीने तयार केले जाते आणि विकले जाते याबदलचा एका व्हिडीओ कुर्ला स्थाकावरून  व्हायरल झाला होता. त्यामुळे  मध्य रेल्वेप्रशासनाला उशिरा का होईना  जाग आली असून, रेल्वे स्थानकांवरील लिंबू सरबत, ऑरेंज ज्यूस, काला खट्टा यांच्या खुल्या विक्रीवर रेल्वेने  बंदी घातली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. त्यामुळे आता कोणतेही खुले शरबत स्थानकावर मिळणार नाही.
 
मुंबई येथील कुर्ला स्थानकावरील व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार  व्हायरल झाला होता. यामध्ये  लिंबू सरबत तयार करताना होणारा अस्वच्छ पाण्याचा वापर व बनवण्याची घाणेरडी पद्धत आदी प्रकार  स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला होता.   मध्य रेल्वेप्रशासनानं लिंबू सरबत, ऑरेंज ज्यूस, काला खट्टाच्या खुल्या विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्थानकांवर ज्यूस विकण्यासाठी 2013 मध्ये परवानगी देण्यात आली होती. मात्र अश्या प्रकारे विक्री होतेय आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने आता रेल्वेने हा निणर्य घेतला आहे.