1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

ऍपल क्रेडिट कार्ड लॉन्च, हाय-सिक्योरिटीने सुसज्ज, प्रत्येकदा मिळेल कॅशबॅक

टेक्नोलॉजीची दिग्गज कंपनी Apple ने आपल्या इव्हेंटमध्ये ऍपल ऍपल टीव्ही प्लस, ऍपल कार्ड, ऍपल न्यूज प्लस, ऍपल टीव्ही ऍप सारख्या सेवा लॉन्च केल्या आहे. या सर्वांमध्ये ऍपल क्रेडिट कार्ड अत्यंत खास आहे कारण की ऍपलच्या या क्रेडिटसह फ्रॉड करणे आव्हानच आहे. ऍपलने आपल्या या क्रेडिट कार्डच्या सिक्योरिटीबाबत कुठल्याही प्रकाराची तडजोड केलेली नाही. ऍपलने आपल्या क्रेडिट कार्डासाठी अमेरिकी इन्वेस्टमेंट बँक गोल्डमॅन साक्स यासह भागीदारी केली आहे. तर विस्तारपूर्वक जाणून घ्या या खास क्रेडिट कार्डबद्दल:
 
फिजिकल आणि व्हर्च्युअल दोन्ही रूपात उपलब्ध
कंपनीने या कार्डाला ऍपल कार्ड नाव दिले आहे. सर्वात आधी हे जाणून घेणे गरजेचे आहे की आयफोन यूजर्सला हे क्रेडिट कार्ड त्याच्या वॉलेट ऍप मध्येच मिळेल. या क्रेडिट कार्डमध्ये ऍपल पे चा सपोर्ट देण्यात आले आहे. ऍपलचा हे क्रेडिट कार्ड व्हर्च्युअल आणि फिजिकल दोन्ही प्रकाराचे आहे. जर यूजर्स ऍपल क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी करत आहे तर त्याला प्रत्येकदा 2 टक्के कॅशबॅक मिळेल, जर व्यक्ती ऍपलचं प्रॉडक्ट खरेदी करत असेल तर त्याला 3 टक्के कॅशबॅक मिळणार. तसेच फिजिकल कार्डने शॉपिंग केल्यावर 1 टक्के कॅशबॅक मिळेल.
 
हाय सिक्योरिटीने सुसज्ज आहे ऍपल क्रेडिट कार्ड
ऍपलच्या या क्रेडिट कार्डाने फ्रॉड करणे कोणत्याही हॅकर्ससाठी आव्हानात्मक आहे. यासाठी अनेक खास सिक्योरिटी फीचर्स दिले गेले आहेत. सोबतच आपण या कार्डाने खरेदी करत असाल तर कंपनी याबाबत माहिती स्वत:जवळ बाळगणार नाही की आपण कुठून काय खरेदी करत आहात. अशात जाहिरातीसाठी आपला खासगी डेटा बाजारात पोहचणार नाही.
 
फेस आयडीमुळे सिक्योर
ऍपलच्या या कार्डात एक सिक्योरिटी कोड दिले गेले आहे जे बायोमेट्रिक आयडी (फेस आयडी, टच आयडी, फिंगरप्रिंट आयडी) द्वारे काम करतं. अशात कोणी आपल्या ऍपल क्रेडिट कार्डाने फ्रॉड करू बघत असल्यास आपला फोन चोरी करावा लागेल आणि सोबतच कार्ड ऍक्सेस करण्यासाठी आपला चेहरा आणि फिंगरप्रिंट देखील चोरी करावे लागेल जे अशक्य आहे.
 
ऍपल क्रेडिट कार्डाचे फायदे
ऍपलच्या या क्रेडिटचा सर्वात मोठा फायदा आहे की आपल्याला कोणत्या प्रकाराचे एक्सट्रा चार्ज, लेट फीस किंवा पेनाल्टीच्या नावाखाली शुक्ल द्यावं लागणार नाही. हे कार्ड कॉफी शॉप ते मॉल पर्यंत वापरता येईल. या कार्डात आपल्या खरेदीची संपूर्ण माहिती आपल्या फोनमध्ये मिळू शकेल. आपलं दररोजचा खर्च एका ग्राफद्वारे दर्शवण्यात येईल.