मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (08:18 IST)

जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांचा राजीनामा

आर्थिक संकटात सापडलेली विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नरेश गोयल यांच्यासोबत त्यांची पत्नी अनिता गोयल यांनीही जेट एअरवेजमधील आपले पद सोडले आहे.
 
याआधी कंपनीची आर्थिक बाजू कोलमडू लागल्यानंतर स्वत:हून नरेश गोयल यांनी स्वत:हून पुढाकार घेत राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यादरम्यान त्यांनी जेटच्या कर्मचाऱ्यांना एक भावूक पत्र लिहून आपण कुठलेही बलिदान देण्यास तयार आहोत, असे म्हटले होते.
 
नरेश गोयल हे पदावरून दूर झाल्यानंतर आता जेटच्या कर्जपुरवठादारांच्या संघटनेचे सदस्य त्यांच्याकडील 51 टक्के भागीदारीचे एअरलाइन्समध्ये विलिनीकरण करू शकतात. त्यानंतर येत्या काही आठवड्यांमधये जेट एअरवेजसाठी नव्या खरेदीदाराचा शोध सुरू होईल. गोयल हे पदावरून दूर झाल्याने आता जेट एअरवेजला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी सीईओ विनय दुबे यांच्यावर आली आहे.