मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (17:43 IST)

स्कोडा ओक्टाव्हियाचा कॉर्पोरेट संस्करण लॉन्च

स्कोडा ऑटो इंडियाने आपली प्रिमियम सेडान कार ऑक्टॅव्हियाचा 'कॉर्पोरेट संस्करण' सादर केला. शोरूममध्ये त्याची किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने आपल्या वक्तव्यात म्हटले की 1.4 टीएसआय (एमटी) पेट्रोल इंजिन ओक्टाव्हिया कॉर्पोरेट संस्करणाची किंमत 15.49 लाख रुपये आणि 2.0 टीडीआय (एमटी) डिझेल इंजिनाची किंमत 16.99 रुपये आहे.
 
स्कोडाचा दावा आहे की 1.4 टीएसआय पेट्रोल इंजिन कार 150 पीएसची ऊर्जा निर्माण करते आणि 16.7 किमी प्रति लीटर मायलेज देते. ही कार 8.1 सेकंदात 100 किमी/तासाची गती धरू शकते आणि अधिकतम वेग 219 किमी प्रति तास आहे. 
 
तर दुसरीकडे 2.0 टीडीआय डिझेल इंजिन 143 पीएसची ऊर्जा निर्माण करते आणि ही कार 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह येते. डिझेल संस्करण 8.4 सेकंदात 100 किमी/तासाची गती मिळवू शकतं आणि त्याची अधिकतम गती 218 किमी प्रति तास आहे. कंपनीने दावा केला आहे की डिझेल व्हर्जन 21 किमी प्रति लीटर मायलेज देईल.