रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 मार्च 2019 (13:12 IST)

धमाकेदार फीचर्ससह लॉचं झाली Yamaha MT-15

बाइक चाहत्यांसाठी भारतीय बाजारात इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्राइवेट लिमिटेडची नवीन सीरीझची एमटी -15 (155 सीसी) लवकरच उपलब्ध होणार आहे. कंपनीने बुद्ध इंटरनॅशनल सर्किट (बीआयसी) मध्ये कंपनीने एमटी -15 (155 सीसी) बाइक दर्शविली होती. भारतात या बाइकची एक्स-शोरूम किंमत 1,36,000 रुपये आहे. यामाहाने आपल्या 'द कॉल ऑफ द ब्लू' कॅम्पेन अंतर्गत नवीन एमटी -15 लॉचं केली. कंपनीच्या मते खासकर यंग जनरेशनकडे लक्ष ठेवून ही बाइक तयार केली गेली आहे. 
 
फीचर्सबद्दल बोलू तर या बाइकमध्ये लिक्विड कूल्ड, 4-स्ट्रोक, एसओएचसी, 4-वाल्व, 6-स्पीड ट्रान्स्मिशन, 155 सीसी फ्यूल इंजेक्टेड इंजिनासह डेल्टा बॉक्स फ्रेमवर वैरिएबल वाल्व एक्च्युशन (व्हीव्हीए) ची सुविधा दिली गेली आहे. यात 58.0 गुणा 58.7 मिमी बोर गुणा स्ट्रोक आणि 11.6:1 चा कंप्रेशन रेशो आहे, ज्यामुळे 10,000 आरपीएम वर 14.2 केव्ही (19.3 पीएस) जास्तीत जास्त आउटपुट आणि 8,500 आरपीएमवर 4.7 एनएम (1.5 केजीएफ एम) कमाल टॉर्क बनतो. 
 
बातम्यांनुसार भारतात यामाहा आपल्या 'द कॉल ऑफ द ब्लु' कॅम्पेन अंतर्गत मोटरसायकलची 3 सिरींज लॉचं करणार आहे. यामध्ये 'आर-सिरींज', 'एफझेड-सीरीझ', आणि नवीन 'एमटी सिरींज' आहे. यामुळे बाइक चाहत्यांना स्टायलिश आणि स्पोर्टी मोटरसायकलिंगचा अनुभव मिळेल.