तुमच्या पीएफचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असा होईल सक्रिय
जर आपले पीएफ कपत असेल आणि आपल्याला याची सर्व माहिती जाणून घ्यायची असेल जसे त्यात किती बॅलेस आहे, किती राशी जमा होत आहे? त्याची माहिती आपण सहजपणे माहिती करून घेऊ शकतात. त्यासाठी कर्मचारी भविष्य निधीने युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ची सुविधा सुरू केली आहे. प्रत्येक कर्मचारी जो ईपीएफमध्ये योगदान देतो, त्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असतो. UAN सक्रिय झाल्यानंतर आपण आपल्या ईपीएफची माहिती सहजपणे घेऊ शकता, पण ते सक्रिय कसे करावे?
हे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आपल्या परागाच्या स्लिपमध्ये लिहिले असते. जर हे लिहिले नसतील तर आपण आपल्या अकाउंट्स विभागच्या खात्यातून माहिती मिळवू शकता. चला जाणून घ्या यूएन नंबर सक्रिय करायची प्रक्रिया.
* सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निधी संगठनाच्या वेबसाइट unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जावे आणि पृष्ठाच्या उजव्या बाजूस खाली एक्टीवेट युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) वर क्लिक करावे.
* युनिव्हर्सल अकाउंट नंबर, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि कॅप्चा टॅक्स्ट टाकून, Get Authorization Pin वर क्लिक करावे.
* त्यानंतर आपला जो मोबाइल नंबर ईपीएफओ वर नोंदणीकृत आहे, त्यावर आपल्याला ओटीपी मिळेल.
* त्यानंतर EPFO पेजवर सर्व तपशील पडताळणी करावे आणि मग I Agree वर क्लिक करावे.
* त्यानंतर ओटीपी प्रविष्ट करावे आणि वैलिडेट ओटीपी वर क्लिक करून आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करावा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला UAN सक्रिय होईल आणि आपल्याला मोबाइलवर पासवर्ड मिळेल. हे लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या पीएफचे बॅलेस चेक करू शकता.