बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2019 (08:54 IST)

पोहतांना आला हृदयविकाराचा झटका व्यक्तीचा मृत्यू

नाशिकमध्ये स्विमिंग केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एका ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हेमंत तराटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शहरातील वीर सावरकर जलतरण तलाव परिसरात सदरची घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
शहरातील द्वारका परिसरातील रहिवासी असलेले हेंमत तरटे पोहण्यासाठी जलतरण तलावात गेले होते. स्विमिंग केल्यानंतर बाहेर येताच लॉकर रूम जवळ त्यांना हृदविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.