1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2019 (10:06 IST)

अजिक्यने व्यक्त केली शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता

jinkya rahane
टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचला. शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. आपण जर सुखाचा घास घेत असू तर तो फक्त शेतकऱ्यामुळे, म्हणून शेतकऱ्याला कधीही विसरु नका, असं आवाहन अजिंक्य रहाणेने केलंय.
 
व्हिडीओमध्ये अजिंक्य रहाणे एका शेतकऱ्यासोबत दिसत आहे. या बाबत तो म्हणतो, “एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे माझ्या मनात शेतकऱ्यांकरिता खूप आदर आहे. जर आज आपल्या ताटामध्ये अन्न आहे, ते फक्त शेतकऱ्यांमुळे. त्यांच्या दररोजच्या मेहनतीमुळे आज आपण सुखाचे घास घेत आहोत.”