आनंद महिंद्रा यांनी अर्नब गोस्वामीला खडसावले जरा तारतम्य बाळगा
पाकिस्तानच्या ताब्यात असलेला आपल्या देशाचे वीरपुत्र भारतीय हवाईदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान याची पाकिस्तान सुटका करणार आहेत. याबद्दल घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक संसदेत केली. या बातमीनंतर देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काही दिवसांपासून भारतीय वृत्तवाहिन्यांनी पुलवामा व विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचं केलेलं वृत्तांकन अनेक लोकांच्या पचनी पडत नाहीय. दोन देशांपेक्षा भारतीय प्रसारमाध्यमांनाच युद्ध हवं आहे, त्यामुळे या वाहिन्यांवर निर्बंध घालावेत अशी मागणीही सोशल मीडियावर अनेक करत आहेत. हा रोष आणि धागा पकडत प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी, रिपब्लीक टिव्हीच्या ट्विटर हँडलवर, बातमीचं वृत्तांकन करताना तारतम्य बाळगा असा सल्ला पत्रकार अर्णब गोस्वामी यांना दिला आहे.
आनंद महिंद्रा म्हणतात की "मी कधीही प्रसारमाध्यमांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्यक्त होत नाही. मात्र सध्या अभिनंदनच सुखरुप भारतात परतण हे फार महत्वाचं असून, अशाप्रकारे आनंदोत्सव साजरा करुन या प्रक्रियेत खोडा घालता कमा नये. अर्णब आपण वृत्तांकन करताना ताळतंत्र बाळगायलाच हवं…अशा आशयाचा संदेश देत महिंद्रा यांनी दिला आहे."