मोदी खात नाहीत मात्र दुसऱ्याकडून हिस्सा मागतात - आंबेडकर
बाळसाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर पुन्हा सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: खात नाहीत. मात्र, ते दुसऱ्यांना खायला लावून नंतर त्यामधला हिस्सा घेतात, भारिप बहुजन पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. औरंगाबाद येथे भारिप आणि एमआयएम पक्षाच्या संयुक्त सभेत त्यांनी असे वक्तव्य केले. प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. नेहमी आमचा पंतप्रधान स्वच्छ चारित्र्याचा असल्याचा दावा भाजपा नेते करतात, ही गोष्ट मी मान्य करतो. मात्र, मी एक सांगू इच्छितो की, पंतप्रधान मोदी हे स्वत: खात नाहीत. मात्र, ते इतरांना खायला लावून नंतर त्यामध्ये हिस्सा मागतात, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले आहे. आंबेडकर यांच्या सभांना जोरदार गर्दी होत आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारला इशारा देताना म्हटले की, तुमचा सत्तेच्या परवान्याचे नुतनीकरण करायचे की नाही, हे जनतेच्या हातात आहे. शेतकऱ्यांना अनुदान किंवा कर्जमाफी देण्याची वेळ येते तेव्हा भाजपचे नेते स्वत:च्या खिशातून पैसे जात असल्यासारखे वागतात. येत्या काळात भाजपला नुसती निवडणूक लढायची नाही तर त्यांचे सीट ठेवायची कसरत करावी लागणार असून, अनेक पक्षाच्या विरोधाचा सामना करावा लाणार आहे.