सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (16:05 IST)

काश्मीर आमचेच : पंतप्रधान मोदी यांनी अप्रत्यक्ष ठणकावले, पाक तोंडघशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना ठणकावले आहे. खान यांना पाठवलेल्या अभिनंदन पत्रात काश्मीर विषयी कोणतीही चर्चा नको असे सुनावले असून, त्यामुळे पाकिस्तान तोंडघशी पडले आहे. नरेंद्र मोदींनीइम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अभिनंदन करणारं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं, त्यांचा हा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानंच फेटाळले आहे.  पत्रातून मोदींनी इम्रान खान यांचं अभिनंदन केल आहे. दोन देशांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी, असं पत्रात नमूद असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अंतर्गत किती कलह आहे दिसून येतो आहे. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.