शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (15:34 IST)

स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ल्याचा कट उघड

जम्मू कश्मीर पोलिसांनी गांधीनगर भागातून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ८ हँड ग्रेनेड आणि ६० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. अरफान वाणी असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील रहिवासी आहे. त्याच्याकडील हँड ग्रेनेड तो दिल्लीतील एका व्यक्तीला देणार होता. स्वातंत्र्यदिनी त्यांचा वापर हल्ल्यासाठी करण्यात येणार होता.
 
या दहशतवाद्याला अटक करून पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी जम्मू कश्मीर आणि दिल्लीत स्वातंत्र्यदिनी हल्ले करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिली आहे. या दहशतवाद्याला अटक झाल्यानंतर जम्मू कश्मीर, दिल्ली आणि इतर मोठ्या शहरांत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.