शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शनिवार, 19 मे 2018 (17:01 IST)

बॉबी डार्लिंगच्या पतीची तिहार जेलमध्ये रवानगी

चित्रपट कलाकार बॉबी डार्लिंगचा पती रमणिक शर्माला दिल्ली पोलिसाांनी अटक केली असून त्याची तिहार जेलमध्ये रवानगी केली आहे. बॉबीने आपल्या पतीविरोधात घरगूती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बॉबीने आपला पती आपला जीवही घेऊ शकतो अशी भिती व्यक्त केली होती.

बॉबी डार्लिंगने २०१६मध्ये लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर व्यवसायिक रमणिक शर्मा याच्याशी लग्न केले होते. त्यानंतर  एक वर्ष होत नाही तोच बॉबीने पतीच्या छळाला कंटाळून भोपाळमधून पळ काढला आणि तिच्या माहेरी म्हणजेच दिल्लीला पोहोचली. तिथे जाऊन तिने पोलिसांत तक्रार केली. दुसरिकडे हे सर्व आरोप म्हणजे बॉबीचा पब्लिसिटी स्टंट आहे, असा दावा रमणिकने केला होता. परंतु पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये बॉबीने केलेले सर्व आरोप हे खरे असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.