शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मे 2018 (15:23 IST)

अथर्व शिंदे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी 12 जणांना चौकशी

मुंबई येथील पोलीस अधिकारी पुत्र अथर्व नरेंद्र शिंदे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अथर्व हा गोरेगावातील आरे कॉलनीत मृतावस्थेत आढळला होता,  अथर्व नरेंद्र शिंदे मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा अद्याप पोलिसांना करता आलेला नाही.  ज्या तरुणीचा वाढदिवस होता तिलादेखील पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. तर विशेष म्हणजे तरुणी एका प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्मात्याची मुलगी आहे. अथर्व मैत्रिणीच्या बेस्ट फ्रेन्डच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आरेतील रॉयल पाम येथील बंगल्यावर रविवारी (6 मे) गेला, तर बुधवारी (9 मे) त्याच्या मृतदेह याच भागात जखमी अवस्थेत आढळला होता, त्यामुळे  खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस निरीक्षकाचा मुलगा असलेला अथर्व हा दारूच्या नशेत मदतीसाठी विनवणी करीत असताना अनेक रिक्षाचालकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत भाडे नाकारले होते, मात्र तो दारू पियून जखमी झाला की त्याला मारहाण करण्यात आली याचा शोध आता पोलिस घेत आहेत.