रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: श्रीनगर , शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (12:14 IST)

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. वृत्तानुसार, हे दहशवादी हिजबुल दहशतवादी संघटनेचे होते.
 
शुक्रवारी रात्री सुरक्षा दलाला किलुरा परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर या परिसरात शोधमोहीम सुरु केली असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यास सुरुवात झाली. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जवानांनी पाच दहशतवाद्यांना ठार केले. यामधील एका दहशतवाद्याचे नाव उमर मलिक असल्याचे समजत असून त्याच्याकडून सुरक्षा दलांनी एके-४७ रायफलही हस्तगत केली आहे. दरम्यान, अद्यापही शोधमोहीम सुरु आहे.