मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (14:29 IST)

पंतप्रधान मोदी प्रथमच इंडोनेशिया दौऱ्यावर

भारता सोबत इतर देशांचे संबध चांगले करण्यासाठी पंतप्रधान मोदी पूर्ण जगात फिरत आहे. आता ते प्रथमच पहिल्यांदाच इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आले आहेत. इंडोनेशियासह तीन देशांच्या
दौऱ्यासाठी नवी दिल्ली येथून रवाना झाले. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सागरी सहाय्य, व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी त्यांचे जाकार्ता ठिकाणी आगमन होणार आहे. दौरा तीन दिवसांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत इंडोनेशियातील भारतीय समुदायालाही भेटून संबोधित करणार आहेत. बुधवारी नरेंद्र मोदी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांची भेट घेणार आहेत. भारताचे इंडोनेशियातील राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी सांगितले आहे. इंडोनेशियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उद्योजकांची बैठक, भारतीय उद्योगांसह विविध बैठकांमध्ये मोदी आणि जोको विडोडो सहभागी घेतील.