रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

यंदा कंगना पहिलांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर चालणार

यंदा कान्स फिल्म फेस्टिवल ८ मे ते १९ मे रंगणार आहे. यावर्षी  या फिल्म फेस्टिवलमध्ये सोनम कपूर, दीपिका पादूकोन, ऐश्वर्या राय यांच्या बरोबर कंगनाही रानौत  सहभागी होणार आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत पहिलांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर चालणार आहे. आपल्या ड्रेसिंग सेन्सने नेहमीच चर्चेत राहणारी कंगना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर कोणता लुक करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.

कंगणाची कान्सची तयारी तर पूर्ण झालीय. कंगणा आपल्या सिनेमांमार्फंत दुसऱ्या अॅक्ट्रेसला नेहमीच तगडी स्पर्धा देत आलीय. त्यामुळे कान्समध्येही ती इतर अॅक्ट्रेसला तगडी टक्कर देईल यात शंका नाही. आतापर्यंत ऐश्वर्या यावर्षी सतराव्या वेळा कान्सच्या रेड कार्पेटवर चालण आहे. तर दुसरीकडे लग्नानंतर सोनमसाठी हा फिल्म फेस्टीव्हलसुद्धा खास असणार आहे.