रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 7 एप्रिल 2018 (11:14 IST)

आयपीएलच्या ११व्या पर्वाचा आज उद्घाटन सोहळा

इडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) नव्या दमाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणानंतरही या लीगच्या प्रेक्षकक्षमतेचा झरा आटलेला नाही. त्यामुळे चाहतेही आयपीएलचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या माजी विजेत्यांचे पुनरागमन होत असल्याने त्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शनिवारी आयपीएलच्या ११व्या पर्वाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. त्यानंतर गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्या दर्जेदार  सामना होणार आहे.