सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 12 एप्रिल 2018 (10:23 IST)

चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्यात

चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले आहेत. कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सध्या तामिळनाडूत निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्याला हलवण्यात आले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमऐवजी पुण्याचं गहुंजे येथील मैदान हे आता चेन्नईच्या संघाचं उर्वरित सामन्यांसाठी ‘घरचं मैदान’ असणार आहे. या निर्णयामुळे एकीकडे चेन्नईतील सीएसके संघाच्या पाठीराख्यांचा चांगलाच हिरमोड झाला असला तरी पुणेकरांची आणि विशेषतः धोनीच्या आणि सीएसकेच्या पुण्यातील चाहत्यांची लॉटरीच लागली आहे.