मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified सोमवार, 9 एप्रिल 2018 (11:57 IST)

IPL 2018 : आज हैद्राबादचे राजस्थानला आव्हान

ऐनवेळी आपापले कर्णधार बदलावे लागलेले दोन्ही संघ आज आयपीएलच्या तिसऱ्या दिवशी राजस्थान रॉयल्स समोर सनरायजर्स हैद्राबादचे आव्हान असणार आहे. आयपीएलच्या आकराव्या हंगामात सर्वसंघांनी आपापली पुनर्बांधणी केली आहे. ज्यात हैद्राबादने त्यांचा पुर्वकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि भुवनेश्‍वर कुमार यांना संघात कायम ठेवले होते तर राजस्थानने पुर्वकर्णधार स्टिव स्मिथ आणि अजिंक्‍य रहाणेला संघात कायम ठेवले होते. परंतू दक्षिण आफ्रिकेतील बहुचर्चीत बॉल टेंपरिंग प्रकरणा नंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोघंवरही प्रत्येकी एक वर्षाची बंदी घातल्या नंतर दोघांनाही आयपीएल मध्ये खेळता येणार नसल्याने राजस्थानने अजिंक्‍य राहणेला कर्णधारपद सोपवले तर हैद्राबादने न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यम्सनकडे आपल्या कर्नधारपदाची जवाबदारी दिली.
 
दोन्ही संघांनी आपापल्या संघांची पुनर्बांधनी केली असून दोघांनीही संघ निवडताना चांगला समतोल राखल्याचे दिसून येत आहे. दोन्ही संघांमध्ये यावेळी चांगल्या खेळाडूंचा भरणा असून हैद्राबादच्या फलंदाजीची भिस्त केन विल्यमसन, शिखर धवन, मनीष पांडे, ऋद्धिमान सहा दीपक हूडा, युसुफ पठान, यांच्यावर असणार आहे तर गोलंदाजीची धूरा भुवनेश्‍वर कुमार, मेहेंदी हसन, ख्रिस जॉर्डन, रशिद खान, शाकीब अल हसन यांच्या वर असणार आहे. तर राजस्थानच्या फलंदाजीची मदार अजिंक्‍य रहाण, अंकित शर्मा, संजु सॅमसन, बेन स्टोक्‍स, जोस बटलर, हेन्रीच क्‍लासीन, जोफ्रा आर्चर, डार्सी शॉर्ट, यांच्या वर असणार आहे तर गोलंदाजीची मदार जयदेव उनाडकत, बेन लॉफलिन, धवल कुलकर्णी, जतिन सक्‍सेना, झहिर खान यांच्यावर असणार आहे.
 
प्रतिस्पर्धी संघ 
सनरायजर्स हैद्राबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनिष पांडे, भुवनेश्‍वर कुमार, ऋद्धिमान सहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठान, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थंपी, टी.नटराजन, सचिन बेबी, बिपुल शर्मा, मेहेंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्‍स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशिद खान, शाकीब अल हसन, मोहोम्मद नबी, ख्रिस जॉर्डन आणि बिलि स्टॅनालेक.
 
राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), अंकित शर्मा, संजु सॅमसन, बेन स्टोक्‍स, धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, डार्सी शॉर्ट, दुश्‍मंथा चमीरा, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, एस.मिधुन, जयदेव उनाडकत, बेन लॉफलिन, प्रशांत चोप्रा, क्रिश्‍नप्पा गौथम, महिपाल लोमरोर, जतिन सक्‍सेना, अनुरीत सिंग, आर्यमान बिर्ला, जोस बटलर, हेन्रीच क्‍लासीन, झहिर खान आणि राहुल त्रिपाठी.