शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 10 एप्रिल 2018 (16:42 IST)

मुंबई इंडियन्सच्या पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर

आयपीएलमधून दुखापतीमुळे आऊट झालेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये आता मुंबई इंडियन्सच्या पॅट कमिन्सची भर पडली आहे. पॅट कमिन्सने पाठदुखीमुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. कमिन्स हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील प्रमुख गोलंदाज होता. त्याला ५.४ कोटी मोजून मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. आता कमिन्स आऊट झाल्याने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.
 
पॅट कमिन्सच्या दुखापतीबद्दलच्या वृत्ताला क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डाने दुजोरा दिला आहे. कमिन्सची दुखापत आणखी वाढू नये यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सला विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. कमिन्सच्या पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धची वन-डे मालिका आणि झिम्बाब्वे-पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया या तिरंगी टी-२० मालिकेत खेळता येणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.