सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 11 एप्रिल 2018 (12:56 IST)

आयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग

'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर आता बॉलिवूडचे कलाकारही क्रिकेटच्या पॅव्हेलियनमध्ये दिसायला लागले आहेत. मॅच जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना या बॉलिवूड कलाकारांच्या बरोबर खेळाडूंचा डान्सही फेमस व्हायला लागला आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस क्रिकेटपटू यजुवेंद्र चहलला कमरेत रिंग अडकवून डान्स स्टेप्स शिकवताना दिसते आहे. मात्र युजवेंद्र चहलला या रिंगला सांभाळत काही डान्स करता येईना. त्याचा आटापिटा पाहून जॅकलिनला हसू आवरेना. आपल्याला कसेही करून जॅकलिनप्राणे नाचता आलेच पाहिजे. या अट्टहासापायी चहलही नाचण्याचा खटाटोप करताना दिसतो आहे. आयपीएलच्या नाईट पार्ट्या आणि एन्टरटेनमेंट इव्हेंटमध्ये खेळाडूंसह बॉलिवूड कलाकारांचा जलवा रंग भरायला लागला आहे.