मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

मोदींनी ट्रंप यांना फेसबूकवर मागे टाकले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर मागे टाकलं आहे. पण ट्रंप माइक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर अजूनही पुढे आहेत. कम्युनिकेशन्स कंपनी बरसॉन-मार्टस्टेलर द्वारा केल्या गेलेल्या सर्वेनुसार, पीएम नरेंद्र मोदी फेसबूकवर फॉलो केले जाणारे जगातील पहिल्या स्थानी असलेले नेते आहेत. पंतप्रधान मोदींना 43.2 मिलियन (चार कोटी 32 लाख) लोकं फॉलो करतात. डोनाल्ड ट्रंप यांना 23.1 मिलियन (दोन कोटी 31 लाख) फेसबूक फॉलोअर्स आहेत. आशियाई देशांमध्ये फेसबुक आणि ट्विटरची तुलना केली तर फेसबूक अधिक फॉलो केलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य आशियाई नेते यामुळे फेसबूक फॉलोअर्समध्ये पुढे आहेत.

650 राष्ट्रप्रमुख आणि परराष्ट्र मंत्र्यांचं व्यक्तिगत आणि संस्थेच्या फेसबूक पेजची 1 जानेवारी, 2017 पासून आतापर्यंत केलेल्या पोस्टचं यामध्ये परिक्षण करण्यात आलं. डोनाल्ड ट्रंप यांच्या पेजवर सर्वाधिक चर्चा, (कमेंट, लाईक, शेयर) झाले आहेत. मागील 14 महिन्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या पेजवर एकूण 20 कोटी 49 लाख इंटरअॅक्शन झाले आहेत. तर पीएम मोदींच्या पेजवर 11 कोटी 36 लाख लोकांनी इंटरअॅक्शन केलं आहे. डोनाल्ड ट्रंप फेसबूक पेजवर कमीत कमी 5 पोस्ट रोज करतात. जे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केल्या जाणाऱ्या पोस्टच्या बाबतीत जास्त आहे.