बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

लवकरच फेसबुकवर डिसलाइक फीचर येणार

लवकरच फेसबुकवर डिसलाइक फीचर येणार आहे. फेसबुककडून डिसलाइक बटण टेस्टिंग सुरू झाली आहे. फेसबुकवरील लाइक बटनबरोबरच डिसलाइक बटणची मागणी युजर्सकडून वारंवार होत होती. या मागणीनंतर फेसबुककडून डिसलाइक बटन आणण्याची तयारी सुरू झाली आहे.

फेसबुकवरील हे बटण नेटिझन्सच्या आक्षेपार्ह कमेन्टसाठी आहे. सोशल मीडियावर लोक याचा वापर करून एखादी आक्षेपार्ह पोस्ट डिसलाइक करू शकता.
 

फेसबुकवर येणारं डिसलाइक बटण डाऊनवोटप्रमाणे काम करणार असल्याचं बोललं जात आहे. लाइक बटण ज्याप्रमाणे अपसाइड थंब असतं त्याप्रमाणे डिसलाइक बटण डाऊनसाइड थंब असेल अशी शक्यता होती. पण त्याऐवजी आता एका बाणाच्या आकाराचं बटन असेल, असं बोललं जात आहे. फेसबुकचं हे नवं बटण सध्या फक्त न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहे.