रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मे 2018 (09:41 IST)

राज ठाकरे यांची ट्विटरवरही दणक्यात एन्ट्री

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकनंतर आता ट्विटरवरही दणक्यात एन्ट्री घेतली आहे.  ट्विटरवर राज ठाकरे यांचे @RajThackeray असे ट्विटर हँडल असून, ते व्हेरिफाईड अकाऊंट आहे. सध्यातरी राज ठाकरे कुणालाही फॉलो करत नसून, त्यांचे फॉलोअर्स मात्र वेगाने वाढत आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी अद्याप कोणतेही ट्वीट केलेले नाही. एमएनएस अधिकृत या मनसेच्या अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्या ट्विटर एन्ट्रीची माहिती देण्यात आली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांसह अनेक ट्विटराईट्सनी राज ठाकरेंच्या अकाऊंटवर उड्या घेतल्या.