सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2019 (17:19 IST)

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाने नवीन जर्सी केली लॉन्च, अभिनंदन नंबर वन

भारतीय टीमची वर्ल्ड कप 2019 जर्सी शुक्रवारी हैदराबादमध्ये लॉन्च करण्यात आली आणि या प्रसंगी माजी कर्णधार धोनी, वर्तमान कर्णधार विराट कोहली, टेस्ट व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ उपस्थित होते. 
 
बीसीसीआयने वाघा सीमेवरून भारतात परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या घरी परतण्याचा उत्सव आपल्या वेगळ्या शैलीत साजरा केला. बीसीसीआयने शुक्रवारी टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च केली, आणि त्यात एक विशेष जर्सी पायलट अभिनंदनच्या नावाची होती. जर्सीच्या मागे क्रमांक 1 लिहिला आणि खाली अभिनंदन यांचे नाव आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या सन्मानार्थ बीसीसीआयच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर खूप प्रशंसा होत आहे. 
 
बीसीसीआयने पायलटला सन्मानित करणारी जर्सी जवळजवळ त्याच वेळी लॉन्च केली, जेव्हा विंग कमांडर अभिनंदनने पाकिस्तानमध्ये 60 तास घालवल्यानंतर भारताच्या जमिनीवर पाऊल ठेवले.