नीरव मोदीच्या 11 कार, 173 पेंटिंग्जचा होणार लिलाव
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झाली असतानाच मुंबईतील पीएएलए कोर्टानेही त्याला झटका दिला आहे. नीरव मोदीच्या मालकीच्या 11 पॉश कार आणि 173 महागड्या पेंटिंग्जचा लिलाव करण्यास कोर्टाने अंलबजावणी संचालनालयाला (ईडी) परवानगी दिली आहे.
नीरव मोदीकडे रोल्स रॉयल, पोर्श, मर्सिडीज आणि टोयाटो फॉर्च्युनर यासारख्या महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे पेंटिंग्जचे जे कलेक्शन आहे, त्याची किंमत अंदाजे 57.72 कोटी इतकी आहे. हे सगळेच नीरव मोदीच्या हातून निसटले असून याच महिन्यात या सर्वाचा लिलाव ठेवण्यात येईल, असे ईडीच्या एका अधिकार्याने सांगितले. या लिलावात आयकर विभागाने जमा केलेल्या 68 पेंटिंग्जची विक्री करण्यासही कोर्टाकडून संमती मिळाली असल्याचे या अधिकार्याने नमूद केले. पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी भारताबाहेर पसार झाला आहे.