रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2019 (09:22 IST)

‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मैं भी चौकीदार’या संकल्पनेला माझा पाठिंबा आहे. मीदेखील सोशल मीडियावरील खात्यावर माझ्या नावासमोर ‘चौकीदार’शब्द जोडला होता. मात्र यानंतर जाणीवपूर्वक ट्रोल करण्यात आल्याने माझ्यामुळे या संकल्पनेवर टीका होऊ नये व त्याला फटका बसू नये म्हणून आपल्या नावासमोरून चौकीदार नाव हटवल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कारभारात कधीही हस्तक्षेप केला नाही. माझी कधीही घुसमट झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.