गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2019 (23:59 IST)

Whatsapp चा Advance Search फीचर येणार

इन्स्टंट मेसेजिंग एप व्हाट्सएपवर पण फोटो, व्हिडिओ, जीआयएफ किंवा डॉक्युमेंट सर्च करायचा असेल तर काय करावे? त्याच्यासाठी फाइल मॅनेजरमध्ये जाऊन शोधावा लागतो आणि त्यात खूप वेळ लागतो. पण आता तसे होणार नाही. प्रत्यक्षात, व्हाट्सएप नवीन सर्च फीचरवर कार्य करत आहे, ज्याला अॅडव्हान्स सर्च म्हणतात. व्हाट्सएपच्या या फीचरच्या मदतीने वापरकर्ते विविध प्रकारचे संदेश शोधू शकतात. या फीचरची सध्या बीटा वर्जनवर तपासणी सुरू आहे. व्हाट्सएपमध्ये लवकरच हे फीचर वापरकर्त्यास उपलब्ध होईल. 
 
* चॅटमध्ये दिसेल फीचर - इन्स्टंट मेसेजिंग एपचा हा फीचर चॅटमध्ये दिसेल. यावर टच करून वापरकर्त्यास व्हाट्सएप मध्ये फोटो, जीआयएफ, लिंक, व्हिडिओ, डॉक्युमेंट आणि ऑडियो इत्यादी शोधता येतील. त्याचबरोबर वापरकर्ताला रीसेंटली सर्च यादी देखील मिळेल, आणि वापरकर्ते ती क्लियर देखील करू शकतील.
 
* सोपे आहे शोध घेणे - व्हाट्सएप सर्व ग्रुप आणि चॅट दाखवेल ज्यात सर्च संबंधित मीडिया फाइल असेल. त्याचबरोबर चॅट मध्ये आपण मीडियाचे प्रीव्यू देखील पाहू शकाल. एका ग्रुपमध्ये आपण या सर्च फीचरचा वापर करून आपली फाइल शोधू शकता. माहितीनुसार, हे वैशिष्ट्य iphone वापरकर्त्यांसह Android वापरकर्त्यासाठी देखील उपलब्ध असेल.