रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 21 जानेवारी 2019 (13:49 IST)

फेसबुक व्हिडिओ डाउनलोड करण्याचा सर्वात सोपी पद्धत

आपल्यातून बरेच लोक फेसबुक वापरत असतील. कधीकधी अस होत की फेसबुक टाइमलाइन पाहतं असताना असा कोणता व्हिडिओ समोर येतो जो आपल्याला सेव्ह किंवा डाउनलोड करायचा असतो पण डाउनलोड करू शकत नाही, कारण की आपल्याला फेसबुक व्हिडिओ डाउनलोड करण्याची पद्धत माहीत नसते. चला मग आज आम्ही आपल्याला लॅपटॉप आणि मोबाइलवर फेसबुक व्हिडिओ डाउनलोड कसे करतात हे सांगू.
 
जर आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर फेसबुक व्हिडिओ डाउनलोड करू इच्छित असाल तर fbdown.net वेबसाइट आपल्याला मदत करू शकतो, तथापि यासाठी आपल्याला काही चरणांचे अनुसरणं करावे लागतील. जे व्हिडिओ आपण डाउनलोड करू इच्छित आहात, त्या व्हिडिओवर राइट क्लिक करून 'Show video URL' मधून व्हिडिओची URL कॉपी करा. यानंतर fbdown.net वर जा. आता कॉपी केलेल्या व्हिडिओ लिंकला सर्च बारमध्ये पेस्ट केल्यानंतर डाउनलोड बटण क्लिक करा. या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो उघडेल, त्यात विचारले जाईल की आपण व्हिडिओ Download Video in Normal Quality किंवा Download Video in HD Quality मधील कोणत्या स्वरूपात डाउनलोड करू इच्छित आहात. आता या दोन्ही पर्यायांमधून कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, त्यात आपल्याला व्हिडिओ दिसेल. आता व्हिडिओच्या शेवटी तीन डॉट वर क्लिक करून आपल्याला व्हिडिओ डाउनलोड करावा लागेल. 
 
अँड्रॉइड फोनमध्ये फेसबुक व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी जे व्हिडिओ आपण डाउनलोड करू इच्छित आहात, त्यावर क्लिक करा. आता आपल्याला एक शेअर बटण दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर आपल्याला अनेक पर्याय दिसतील परंतु आपल्याला कॉपी लिंकवर क्लिक करायचे आहे ले लक्षात ठेवा. यानंतर आपल्या फोनच्या ब्राउझरमध्ये fbdown.net उघडा आणि सर्च बारमध्ये लिंक पेस्ट करा. लिंक पेस्ट करण्यासाठी सर्च बॉक्समध्ये क्लिक करा आणि काही वेळ धरून ठेवा. यानंतर आपल्याकडे पेस्ट करण्याचा पर्याय असेल. लिंक पेस्ट झाल्यानंतर आपल्याला डाउनलोड बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याला पुन्हा त्याचे अनुसरणं करावे लागेल. म्हणजे डाउनलोड बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक विंडो उघडेल, त्यात विचारले जाईल की आपण व्हिडिओ Download Video in Normal Quality किंवा Download Video in HD Quality मधील कोणत्या स्वरूपात डाउनलोड करू इच्छित आहात. आता या दोन्ही पर्यायांमधून कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ आपोआप डाउनलोड होईल.