Honor 10 Lite भारतात 15 जानेवारी रोजी लॉन्च होणार
हुवावेचा सब-ब्रँड Honor भारतात नवीन स्मार्टफोन लॉच करण्यासाठी तयार आहे. Honor 15 जानेवारी रोजी भारतात Honor 10 Lite स्मार्टफोन लॉच करणार आहे. तसेच Honor 10 Lite फोनची विक्री विशेषतः फ्लिपकार्टवरून होईल. ही माहिती कंपनीने स्वत: च्या निवेदनात दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात 24 एमपी एआय सेल्फी कॅमेरा मिळेल. हा फोन पहिल्यांदा गेल्या वर्षी चीनमध्ये लॉच झाला होता.
* Honor 10 Lite चे फीचर्स
Honor 10 Lite मध्ये 6.21 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2340×1080 पिक्सेल आहे. ग्राफिक्ससाठी ARM माली G51 MP4 GPU मिळेल. हा फोन 4 जीबी / 6 जीबी रॅम आणि 64 जीबी / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढविण्यात येईल.
यात ड्युअल रिअर कॅमेरा मिळेल ज्यामध्ये एक कॅमेरा 13 मेगापिक्सेल आणि दुसरा 2 मेगापिक्सेल असेल. तिथे फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सेल आहे. या फोनमध्ये आपल्याला ड्युअल सिम सपोर्टसह ड्यू-ड्रॉप डिस्प्ले, हाईसीलिकॉन किरिन 710 प्रोसेसर आणि दोन्ही कॅमेरे सह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे समर्थन मिळेल. या व्यतिरिक्त, फोनमध्ये आऊट ऑफ बॉक्स Android Pie 9.0 मिळेल. फोनमध्ये 3400 एमएएच बॅटरी देखील मिळेल.