मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (08:13 IST)

राज्यातील तापमानात मोठी वाढ

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच भागात मागील आठवड्यापासून किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. परिणामी, उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान, सध्या पाऊस पडण्यास पोषक वातावरण तयार झाल्यामुळे 23 आणि 24 मार्चला कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
उत्तरेकडील अति थंड वार्‍यामुळे राज्यातील अनेक भागातील किमान तापमान सरासरीच्या खाली गेल्यामुळे थंडी वाढली होती, तर त्याचवेळी कमाल तापमानाचा पारा वाढल्याने उकाडाही चांगलाच वाढला होता. अधूनमधून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले.