बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (09:19 IST)

सेलिब्रेटी करणार मतदानाचे आवाहन

लोकसभा निवडणूकीत नवतरूण मतदारांनी घराबाहेर पडून मतदान म्हणून राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नामवंत खेळाडू, सिनेकलावंत, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. या सेलिब्रेटींच्या माध्यमातून मतदारांना मतदान कऱण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. 
 
लोकसभा निवडणूकीत सर्वात कमी म्हणजे 50 टक्क्यांच्या जवळपास मतदान होते. हे चित्र बदलावे  आणि मतदारांनी उदासिनता न दाखवता मतदान करावे, यासाठी आयोगाने मोहीमा आणि कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यातून मतदारांना त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणिव करून देण्यासाठी राज्य निवडणूक आयोग राज्यातील नामवंत खेळाडू, सिनेकलावंत, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेणार आहे. यामध्ये अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना, अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू विरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, धावपटू ललिता बाबर, सिने कलावंत प्रशांत दामले, उषा जाधव, निशिगंधा वाड तसेच तृतीयपंथीय सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश संगित यांचा समावेश करण्यात आला आहे.