बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (09:05 IST)

रंगीत व्होटर आयडी कार्डमध्ये बारकोडचा समावेश

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) वाटप करण्यास सुरूवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे ४६ लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. रंगीत पीव्हीसी कार्डमध्ये बारकोडचा समावेश असणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोहिमला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या मतदारांना टप्प्याटप्प्याने वितरण  ओळखपत्राचे होणार आहे.
 
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र (Electoral Photo ID Card –ईपिक आयडी) असणे आवश्यक आहे. यासाठी भारतातील निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारांना ओळखपत्र दिले आहे. यापूर्वी संगणकावर मुद्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते. परंतु आता आकर्षक असे, रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येणार आहे. ज्या नागरिकांकडे असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्र मिळणार ज्यांनी नवी ओळखपत्रासाठी अर्ज केला आहे त्या मतदारांना केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन ओळखपत्र देण्यात येणार अथवा संबंधित कार्यालयात हे ओळखपत्र देण्यात येईल. मतदाराच्या नावात, पत्त्त्यात, लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांमुळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येईल. अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यात येणार आहे.