1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 4 जुलै 2018 (09:17 IST)

राहुल द्रविडचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

Rahul Dravid
भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये  समावेश करण्यात आला. हा सन्मान मिळवणारा राहुल द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू आहे. याआधी बिशन सिंह बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव आणि अनिल कुंबळे यांचा समावेश आहे. पण या सन्मानाचा मान अद्याप क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मिळाला नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित राहिले असतील. 
 
‘हॉल ऑफ फेम’मध्ये एखाद्या खेळाडूची निवड करण्यासाठी किंवा खेळाडूंचे नामांकन करणाऱ्यामध्ये प्रमुख पत्रकार, पंच, मॅच रेफरी किंवा प्रशासक यांचा सामावेश आहे. ‘हॉल ऑफ फेम’मध्ये सामाविष्ट होण्यासाठी जे नियम आहेत त्यामध्ये सचिन तेंडुलकर फिट बसत नाही. म्हणून सचिनला ‘हॉल ऑफ फेम’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही.